सब्‍सक्राईब करें

क्या आप ईमेल पर नियमित कहानियां प्राप्त करना चाहेंगे?

नियमित अपडेट के लिए सब्‍सक्राईब करें।

5 mins read

एक निष्‍काम कर्मयोगी-नानाजी देशमुख

भालचंद्र जोशी | उत्तर प्रदेश

parivartan-img

प्रसिद्ध उद्योजक श्री घनश्यामदास बिर्ला यांना या तरुणाला आपला सचिव म्हणून नियुक्त करायचे होते. चांगला पगार रहाणे आणि जेवण फुकट होते. 21 वर्षाच्या या युवकाने राजस्थानच्या पिलानी मधल्या प्रसिद्ध बिर्ला कॉलेजमध्ये फुटबॉलपासून, वाद विवाद स्पर्धा आणि अभ्यास प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवली होती.




पण चंडिकादास देशमुखांनी बिरला यांच्या  या प्रस्तावाला नकार देऊन डॉक्टर हेडगेवार यांच्या कडून दीक्षा घेतली, आणि ते संघप्रचारक झाले. महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यात हिंगोली तालुक्यातल्या कडोली या छोट्याशा गावात अमृतराव आणि राजाबाई देशमुख या दाम्पत्याच्या पाचव्या आणि सगळ्यात लहान पुत्राचा जन्म झाला. एका अशिक्षित परिवारात जन्म घेऊन सुद्धा आपली दृढ इच्छाशक्ती, कठीण परिश्रम आणि राष्ट्रभक्तीच्या आधारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चंडिकादास विजयी झाले. चित्रकूट सारख्या मागासलेल्या विभागातल्या पाचशे गावांमध्ये ग्रामविकास आणि देशाच्या प्रथम ग्रामीण विद्यालयाचा पाया रचत नानाजी देशमुख यांनी सेवाकार्यामध्ये  कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी आदर्श प्रस्थापित केला आहे. 




अशिक्षित आणि गरीब आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतलेल्या नानाजींना अकरावीपर्यंत शिक्षण पण नाही मिळालं. अभ्यास करण्यासाठी त्यांनी लहानपणी भाजी विकण्यापासून, पेपर विकण्या पर्यंत सर्व प्रकारची कामे केली. 1934 साली हेडगेवारजींनी ज्या सतरा स्वयंसेवकांना संघाची दीक्षा दिली, त्यात अठरा वर्षाचे चंडिकादास देशमुख हे देखील सामिल होते. प्रचारक झाल्या झाल्या सेवेची पहिली संधि मिळताच, नानाजिंनी  स्वत ला सिद्ध् केले.




1944 साली नारायणी नदीला आलेल्या पुरात छितौली गावात नानाजींनी इतर स्वयंसेवकांसोबत गावकऱ्यांची भरपूर सेवा केली. गांधीहत्येनंतर  आलेल्या संघबंदीनंतर त्यांना सहा महिने तुरुंगवास झाला. नंतर संघाच्या आदेशानुसार जनसंघाच्या उभारणीच्या कार्यात पूर्ण शक्तीनिशी त्यांनी काम केले. 1951 साली संघाने राष्ट्रीय विचारांच्या जनसंघाला पुढे नेण्याची जबाबदारी नानाजी आणि दीनदयाळजी यांना दिली होती, जनसंघाच्या जन्मापासून ते इंदिरा गांधीच्या पतना पर्यंत नानाजींच्या राजनैतिक भूमिकेने सगळ्यांना चमत्कृत केले होते.

विभिन्न विचारांच्या लोकांना एकत्र आणण्यात आणि जयप्रकाशजींच्या आंदोलनात ज्या राष्ट्रीय विचारांच्या पक्षांना विजय मिळाला, त्याची व्यूहरचना सुद्धा नानाजींनीच  केली होती. 1975  साली संघ बंदीत त्यांना पुन्हा सतरा महिन्याचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगात असताना त्यांनी परिस्थितीचा अभ्यास आणि चिंतन मनन केले, आणि ते या निर्णयावर पोहोचले, की या विकृत राजकारणामुळे देशाचे कल्याण होऊ शकणार नाही, आणि गावाचा विकास होणे हे तर अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी सेवेचा मार्ग निवडला. राजसत्ता नाही तर लोक शक्तीमुळेच देशाचे पुनर्निर्माण होईल, या विश्वासावरच नानाजींनी कॅबिनेट मंत्री पद नाकारून राजकारणातून संन्यास घेतला. यासाठी त्यानी सर्वप्रथम उत्तर प्रदेशच्या मागासलेल्या गोंडा जिल्ह्यात कार्य सुरू केले. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी, या ध्येयावर काम करत त्यांनी परंपरागत साधनांनिच गावांचा विकास केला. प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य देऊनच आपण देशाचा विकास करू शकतो याच विचाराने त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानाची स्थापना केली. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सदाचार या चारसूत्री आधाराने, संस्थानाने चित्रकूट आणि आजूबाजूच्या पाचशे गावांच्या विकासाचा प्रारंभ केला. परंपरागत उद्योगांचा विकास, जैविक शेती, पाण्याचे नियोजन, याद्वारे गावांची दशा व दिशा बदलली. नानाजींच्या  आवाहनानंतर अनेक शिकलेल्या दाम्पत्यांनी, या गावांमध्ये सेवा केली. नानाजींमुळे गावातली लोकं स्वतंत्र झाली आणि त्याचबरोबर त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळेल हे पण त्यांनी सुनिश्चित केल. नानाजींचं संपूर्ण जीवन त्याग आणि निष्काम कर्मयोगाचे आदर्श उदाहरण आहे. राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर सुद्धा आपल्याला मिळण्याऱ्या प्रत्येक रुपयाचा, चित्रकूटच्या  विकासासाठी खर्च करणाऱ्या नानाजींनी आपला देहसुद्धा वैद्यकीय संशोधनासाठी दान केला.

1600 Views
अगली कहानी